शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

सरले वर्ष ... उरल्या आठवणी

 ( काव्य प्रकार :  सुधाकरी रचना )


दिवसें दिवस 
महिना महिना 
काळ हा पुराना 
सदोदित 


नवाच हा ध्यास 
नवीच ती स्वप्ने 
नवे हे तराणे 
सुखे गाऊ 


जन्म हा लहान 
वाटावे ते चित्ती 
मृत्यूची का भीती 
मानवाला  ?


वाटावे इतरां 
हाच मुक्त पक्षी 
आनंदाची नक्षी 
दिसे नभी 


आयुष्य हा वारा 
आसवांचे पाणी 
दु:ख तिन्ही लोकी 
का असावे  ?


जाऊ द्या हो धन 
येते आणि जाते 
हे कर्माचे पोते 
मानवाचे 


द्या फेकून मागे 
चुकांचे गाठोडे 
नशीबाचे कोडे 
सुटेलच 


कर्म असे व्हावे 
जाता देवा घरां
देवाने शाब्बास 
म्हणावेच 


हे ध्यानात धरा 
या आगामी वर्षी 
पुण्याच्या या राशी 
जोडाव्यात 


वाचा गीता ग्रंथ 
वाचा दासबोध 
हा स्वत:चा शोध 
नव्या वर्षी 



दर्शन जोशी 
संगमनेर