दर्शनीय
गुरुवार, १४ जून, २०१८
नातं
क्षितिजापल्याड झेपावणारं
आपलं नातं
अलगद स्पर्श करणारं
आपलं नातं
शब्दाविना बोलणारं
आपलं नातं
मनातल्या मनात सुखावणारं
आपलं नातं
तुझ्या आठवणीत रमवणारं
आपलं नातं
तुझ्या प्राणात माझा प्राण
आपलं नातं
दर्शन जोशी ,
संगमनेर
सोमवार, ११ जून, २०१८
कविता
एखादाच असेल
सर्वांनीच आजचा दिवस
बेधुंदपणे साजरा केला असेल
माझ्यासारखा अवघडून बसणारा
तुमच्यामध्ये एखादाच असेल
मी असं नाही म्हणत की
मी खोटे बोलत नाही
मी असंही समजत नाही
मीच खरं बोलत नाही
चुकत नसूनही माफी मागणारा
तुमच्या यादीत एखादाच असेल
माझ्या मनाचा कोपराही
तुम्हाला खोटा वाटू शकतो
तुमच्यासारखा सभ्य माणूस
पेचात सापडू शकतो
ठरवून खोटं बोलण्याचा
माझा कधीही इरादा नव्हता
देवाशी खरं बोलण्याचा वादा
मी कधीही केला नव्हता
सर्वच चुकांबद्दल पस्तावणारा
माणूस एखादाच पहिला असेल
दर्शन जोशी
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)