प्रेयसी भेटावयास आल्यानंतर प्रियकराच्या भावना
तू आलीस की वनातील
झाडे सुखाने डोलू लागतात
तुझ्या मधाळ हास्याने
फुले सुगंधाने मोहरू लागतात
तुझ्या केसांच्या स्पर्शाने
वारादेखील सुखावतो
तुझ्या नितळ सौंदर्याने लाजून
चंद्रमा ढगाआड लपतो
आगमनाने नाचतो हर्षुनी
हा प्रणयाचा धुंद मयूर
मेघांच्या या संवादिनीतून
सुरेल निघू दे तुझेच सूर
दर्शन जोशी
संगमनेर
दि.१९/१०/२०१७
७०५७४४९३१४
तू आलीस की वनातील
झाडे सुखाने डोलू लागतात
तुझ्या मधाळ हास्याने
फुले सुगंधाने मोहरू लागतात
तुझ्या केसांच्या स्पर्शाने
वारादेखील सुखावतो
तुझ्या नितळ सौंदर्याने लाजून
चंद्रमा ढगाआड लपतो
आगमनाने नाचतो हर्षुनी
हा प्रणयाचा धुंद मयूर
मेघांच्या या संवादिनीतून
सुरेल निघू दे तुझेच सूर
दर्शन जोशी
संगमनेर
दि.१९/१०/२०१७
७०५७४४९३१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा