ज्या गोष्टी जाणवतात , त्या शब्दबद्ध केल्या आहेत .यातून माणूस कधीही सुटू शकत नाही
मी
मी चा मीपणा सोन्याप्रमाणे
चोवीस कॅरट असावा लागतो
इंग्रजीत हाच आय
सारखाच कॅपिटल लिहावा लागतो
मीच बोलावं समोरच्याने ऐकावं
मानापमानाची गम्मत सारी
आयुष्यभर चालते तऱ्हा
पट भी मेरा चीत भी मेरी
हि अहंकाराची नशा मनातून
काही केल्या जात नाही
हि एकटीच चढते दारु
जी लिंबू सरबताने उतरत नाही
दर्शन जोशी
संगमनेर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा