प्रेयसीने अगदी जागेपणीच नव्हे तर आठवणीतही सोबत असावे , असे वाटणाऱ्या वाचकासाठी
येशील का ?
स्वस्थ असता , निवांत बसता
आठवणीत तू येशील का ?
क्षणभर करीत गप्पा - गोष्टी
घटकाभर तू बसशील का ?
दु:खी असता उदास बसता
समजूत माझी घालशील का ?
हसता खेळता चालता बोलता
मनास उभारी देशील का ?
अंतरातल्या नवीन ध्यासास
स्वप्नांचे पंख देशील का ?
जीवनाच्या या वळणावर
हातात हात घेशील का ?
काळजाला बिलगुनी अलगद
सदैव स्पंदनात राहशील का ?
तनात माझ्या मनात माझ्या
प्राण माझा होशील का ?
दर्शन जोशी
संगमनेर
७०५७४४९३१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा