थोडीफार शब्दसंपत्ती देऊन उपकृत करणाऱ्या प्रत्येकास समर्पित
मी फक्त सांभाळतो
माझी केवळ भक्ती
देणे
हे तुझेच देणे आहे
मी फक्त सांभाळतो
तू संकेत दिलास की
दोनही हातानी उधळतो
हे हास्य तुझेच आहे
भोवताली कणभर आयुष्य आहे
पण तरीही सुरेख संगम
सुख दु:खाचा साधतो
हे ज्ञान तूच दिले
मान माझा झाला
तुझ्या जाणिवांचा आविष्कार
आज नम्रपणे मानतो
हि तुझीच शक्ती आहे
माझी केवळ भक्ती
हे काव्यरूपी थेंब
चातकापरी चाखतो
तुझेच देणे संकेताने
निमित्त होऊन उधळतो
- दर्शन जोशी
संगमनेर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा