बहिण माझी दुधावरच्या
सायीसारखी हाय
आईच्या खालोखाल
जणू प्रेमळ माय
आपुलकीच्या मायेसारखं तिनं
आजपर्यंत वागवलं
तळहाताच्या फोडासारखं
जीवनभर सांभाळलं
गावात उंडारलं कितीही
समजून घ्यायची
माझ्यासाठी मार बापाचा
स्वतः हून खायची
हातपाय खरचटल्यावर अंगाला
लावायची दवा
भगभगत्या जखमेवर मारायची
जोरजोरानं हवा
तिच्या मायेची सर
देवालाही नाही
महिमाही अनंत शब्दांत
पुरणारही नाही
दर्शन जोशी
संगमनेर
७०५७४४९३१४